

Rashmika Mandanna Wins Hearts After Caring for Vijay Deverakonda in Viral Video
sakal
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे सध्या मनोरंजन क्षेत्रातील सर्वात चर्चेत असलेलं जोडपं मानलं जातंय. दोघांच्या डेटिंग काळापासून ते त्यांच्या लग्न आणि नंतर रिसेप्शनपर्यंत त्यांच्याबद्दल चर्चा चालूच होत्या. मात्र या सगळ्यात सर्वांच्या लक्षात राहिली, ती एक गोष्ट म्हणजे रश्मिका आणि विजयने त्याच्या गावाकडील सरकारी शाळेत शिकणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांसाठी देऊ करणार असलेली स्कॉलरशिप.
हेच प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी हे जोडपं तेलंगणातील अचंपेट मंडलमधील थुम्मनपेट गावाला भेट देण्यासाठी गेलं होतं. यावेळी त्यांनी हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली. याच कार्यक्रमादरम्यानचा एक खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.