Aamir Khan Deepfake Video : अभिनेता आमिर खानच्या 'त्या' डीपफेक व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल

Aamir Khan Deepfake Video Case : या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
Aamir Khan Deepfake Video
Aamir Khan Deepfake Video

मुंबई, ता. १९ : अभिनेता आमिर खान राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याची डीपफेक तंत्रज्ञानाद्वारे बनवलेली चित्रफीत सोशल मीडियावर व्‍हायरल झाली होती. याप्रकरणी खार पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

आमिर खानचा आवाज बदलण्यात आला असून ही चित्रफीत ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातील आहे. त्यात भाजपवर टीका करून आमिर काँग्रेसला पाठिंबा दर्शवत असल्याचे दाखवले आहे. याबाबत आमिर खानने ही चित्रफीत बनावट असल्याचा खुलासा केला आहे. आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलेला नसल्याचे आमिर खानने स्पष्ट केले आहे. आमिर खानच्या तक्रारीनंतर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा तपास करत आहे.

Aamir Khan Deepfake Video
Loksabha Election : ताकारीतून थेट मातोश्रीवर फोन.... कुणी कुणाचे केले कौतुक?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com