भारतीय सिनेमात अनेक कलाकारांनी लोकप्रियता मिळवली, पण काही अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले.राज कपूर यांचा लाडका एक बालकलाकारही असा होता ज्याने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला.दुर्दैवाने या कलाकाराचा शेवट अत्यंत दुःखद आणि वाईट परिस्थितीत झाला..Entertainment News : भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजवर अनेक कलाकार होऊन गेले आहेत ज्यांनी अनेकांची मनं जिंकली. त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि लोकप्रियताही मिळाली. पण काही स्टार्स असेही आले जे काही काळानंतर अचानक गायब झाले. असाच एक कलाकार आहे ज्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. राज कपूर यांचा अतिशय लाडका बालकलाकार होता पण त्याचा शेवट अत्यंत वाईट झाला. कोण आहे हा कलाकार जाणून घ्या. .हा बालकलाकार आहे मास्टर रतन कुमार. ज्यांना नंतर रतन कुमार या नावाने ओळखलं जाऊ लागलं. रतनने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं. दो बिघा जमीन,बैजू बावरा, सरगम अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. हा बालकलाकार अतिशय प्रसिद्ध होता. .रतन कुमारचं खरं नाव सय्यद नजीर अली रिजवी होतं. पण सिनेमात काम करू लागल्यावर प्रेम नजीर यांच्या सांगण्यावरून रतन कुमार ठेवलं गेलं. त्यांनी त्यांच्या आयुष्याविषयी एक्सप्रेस ट्रिब्यून पाकिस्तान मध्ये सांगितलं. बॉलिवूडमध्ये काही काळ काम केल्यानंतर ते पाकिस्तानात स्थायिक झाले आणि तिथेही त्यांनी सिनेमांमध्ये नाव कमावलं..रतन कुमार फक्त पाच वर्षांचे आहेत तेव्हाच त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. राख या सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं. रतन कुमार यांनी बालकलाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बैजू बावरा, दो बिघा जमीन या सिनेमांमधून प्रसिद्धी मिळाली. पण जेव्हा त्यांना उत्तम प्रसिद्धी मिळाली तेव्हाच ते पाकिस्तानला निघून गेले. .1956 मध्ये ते कुटूंबाबरोबर पाकिस्तानला स्थायिक झाले. तिथेही त्यांनी सिनेमांमध्ये काम करणं सुरु ठेवलं. 1959 मध्ये त्यांनी पाकिस्तानमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नागीन या पाकिस्तानी सिनेमातही त्यांनी काम केलं. हा सिनेमा सुपरहिट झाला. हा सिनेमा सुपरहिट झाला पण त्यानंतर मात्र त्यांना तितकस यश मिळालं नाही जितकं बालकलाकार म्हणून मिळालं. .1969 मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सत्तरच्या दशकात ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते पण त्याचदरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांचं आयुष्य बेचिराख झालं. 1977 मध्ये लाहोरमध्ये एका अपघातात त्यांच्या मुलीचं निधन झालं. याचा त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी फिल्म इंडस्ट्री सोडली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान देश सोडला आणि ते न्यू जर्सीयामध्ये राहू लागले. .नव्वदच्या दशकात रतन कुमार यांना फुप्फुसाचा त्रास सुरु झाला. 1996 मध्ये त्यांच्या फुप्फुसांची काम करणं सोडून दिल. दोन वेळा त्यांची फुप्फुस बंद पडली आणि तिसऱ्यांदा जेव्हा घडलं तेव्हा त्यांना पॅरालिसीस झाला. ते आठ दिवस कोमामध्ये होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ते कधी चालू शकत नाहीत पण सुदैवाने ते यातून पूर्ण बरे झाले आणि स्वतः चालूही लागले. .पण त्यांचं अखेरचं आयुष्य खूप खडतर गेलं. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर होते. त्यामुळे सतत त्यांना ऑक्सिजन टँक सोबत ठेवावा लागायचा. 12 डिसेंबर 2016 मध्ये त्यांचं निधन झालं. .FAQs :मास्टर रतन कुमार कोण होते?ते १९५०च्या दशकातील अतिशय लोकप्रिय बालकलाकार होते, जे पुढे रतन कुमार या नावाने ओळखले जाऊ लागले.त्यांनी कोणत्या प्रसिद्ध चित्रपटांत काम केलं?दो बिघा जमीन, बैजू बावरा, सरगम यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांत.राज कपूर यांच्यासोबत त्यांचा संबंध कसा होता?राज कपूर यांचे ते लाडके बालकलाकार मानले जात.ते नंतर इंडस्ट्रीमधून का गायब झाले?वय वाढल्यावर चांगल्या संधी मिळणं बंद झालं आणि स्पर्धेमुळे त्यांचं करिअर थांबलं.त्यांचा शेवट कसा झाला?त्यांनी पाकिस्तानमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, पण नंतर तिथेही संघर्ष सुरू राहिला आणि त्यांचा शेवट अतिशय वाईट परिस्थितीत झाला.."मी स्वतःच माझ्या लग्नाची बोलणी केली" गिरीश ओकांच्या लेकीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली...सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.