

ब्रिटिश रॉक बँड 'कोल्ड प्ले'ची कॉन्सर्ट मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर शनिवारी रात्री झाली. या कॉन्सर्टमध्ये कोल्ड प्ले सिंग क्रीस मार्टीनने भारतीय चाहत्यांशी संवाद साधताना जय श्री राम म्हणत उपस्थितांची मनं जिंकली. ख्रिसचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो चाहत्यांना जय श्री राम म्हणत असल्याचं दिसतंय. चाहत्यांनीही यावर जय श्री राम म्हटल्यानंतर ख्रिसने पुन्हा एकदा जय श्री राम म्हटलं. ख्रिसने यावेळी मुंबईत येऊन मला खूप आनंद झाल्याचं हिंदीतून म्हटलं. चाहत्यांशी मोडक्या तोडक्या हिंदीत संवाद साधल्याने चाहतेसुद्धा आनंदी झाले.