‘Damini 2.0’ Returns After 18 Years on Sahyadri Channel
esakal
'दामिनी' ही मालिका एकेकाळी इतकी गाजली की, अनेकांनी पत्रकार होण्याचं स्वप्न बाळगलं. 1997 मध्ये ही मालिका सुरु झाली होती. अनेक हिट मालिकांमध्ये या 'दामिनी' मालिकेचाही सामावेश आहे. मालिकेचं टायटल सॉंन्ग त्याकाळी इतकं हिट झालेलं की त्याची क्रेझ अजूनही ज्येष्ठ लोकांमध्ये आहे. मराठी दूरचित्रवाहिनीवर ही मालिका प्रसारित व्हायची. या मालिकेत निर्भीड पत्रकार दामिनीची कहाणी मांडण्यात आली होती. आता हीच दामिनी पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. दामिनी 2.0 असं मालिकेचं नाव असणार आहे.