RAJ KUNDAN DASHAMI MOVIE VASU ROLE INTERVIEW
esakal
DASHAMI MARATHI MOVIE RAJ KUNDAN ACTING JOURNEY: विजयादशमीचं औचित्य साधत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुन्हेगारी, थरार आणि सामाजिक वास्तवाची सांगड घालणारा हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. योगेश पांडुरंग भोसले यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम यांच्यासह अनेक कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अभिनेत्री गौरी इंगवले ही एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, तिच्यासोबत एका गोड, निरागस वासू या पात्राची भूमिका दाखवण्यात येणार आहे. वासू हे पात्र अभिनेता राज कुंदन साकारणार असून, याच निमित्ताने राज कुंदन यांच्याशी झालेली ही बातचीत...