VIDEO: मुंबईमध्ये स्पॉट झाले दीपवीर; 'मॉम टू बी' दीपिकानं कॅमेरा पाहताच...

Deepika Padukone and Ranveer Singh: रणवीर सिंहनं काही दिवसांपूर्वी दीपिका आणि त्याच्या लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले. त्यामुळे या दोघांचं काही बिनसलंय का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला.
मुंबईमध्ये स्पॉट झाले दीपवीर; 'मॉम टू बी' दीपिकानं कॅमेरा पाहताच...
Deepika Padukone and Ranveer Singhesakal
Updated on

Deepika Padukone: बॉलिवूडचे 'पावर कपल' अशी ओळख असणारे दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे सध्या चर्चेत आहेत. रणवीर सिंहनं काही दिवसांपूर्वी दीपिका आणि त्याच्या लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले. त्यामुळे या दोघांचं काही बिनसलंय का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. अशातच आता दीपवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दीपिकाचा हटके अंदाज बघायला मिळत आहे.

दीपवीरचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिका आणि रणवीर हे कूल लूकमध्ये दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दीपिकानं बेबी बंप झाकण्यासाठी लूज टी-शर्ट घातला आहे. तसेच रणवीर हा व्हाईट टी-शर्ट, डोळ्यावर गॉगल आणि व्हाईट कॅप, अशा हटके लूकमध्ये दिसत आहे.

कॅमेरा पाहताच दीपिकानं....

व्हिडीओमध्ये दिसते की, दीपिकासोबत तिचा बॉडीगार्ड आणि रणवीर दिसत आहे. दीपिका आणि रणवीर हे एका कारच्या मागून जातात, तेवढ्यात दीपिकाची नजर कॅमेऱ्यावर पडते. कॅमेरा पाहताच त्या कॅमेऱ्यावर दीपिका हात मारते आणि पुढे निघून जाते,असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

मुंबईमध्ये स्पॉट झाले दीपवीर; 'मॉम टू बी' दीपिकानं कॅमेरा पाहताच...
Deepika Padukone and Ranveer Singh: गुडन्यूज दिल्यानंतर दीपवीर एअरपोर्टवर झाले स्पॉट; 'मॉम टू बी' दीपिकाला पाहून पापाराझी म्हणाले...

2018 मध्ये रणवीर आणि दीपिका यांनी लग्नगाठ बांधली. आता दोघेही लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "सप्टेंबर 2024". याचा दीपिका ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे.

दीपिका आणि रणवीरचा आगामी चित्रपट

दीपिका आणि रणवीर हे रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरु आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

मुंबईमध्ये स्पॉट झाले दीपवीर; 'मॉम टू बी' दीपिकानं कॅमेरा पाहताच...
Deepika Padukone: अनंत अंबानी- राधिकाच्या 'प्री वेडिंग' फंक्शनमध्ये 'मॉम टू बी' दीपिकाचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com