

Payal Ghosh heartbroken as school friend dies in Delhi blast months after another in plane crash
Esakal
Delhi Bomb Blast: दिल्लीत सोमवारी लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. या स्फोटानं संपूर्ण देश हादरलाय. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की यात १० पेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अपघातातील काही मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान, अभिनेत्री पायल घोषच्या जीवलग मैत्रिणीचा मृत्यू यात झालाय. अभिनेत्रीनंच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. याच अभिनेत्रीच्या एका कॉलेज मैत्रिणीचा अहमदाबाद अपघातातही मृत्यू झाला होता.