devdutt nage on david warner
esakal
DAVID WARNER YELKOT YELKOT JAI MALHAR MOMENT: झी मराठीवरील अभिनेता देवदत्त नागेची 'जय मल्हार' ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेतून देवदत्त नागेनं चाहत्यांमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. दरम्यान जय मल्हार मालिका संपून इतकी वर्ष झाली तरी आजही खंडोबावरील त्याची श्रद्धा कायम आहे. अशातच देवदत्तने एका मुलाखतीत डेव्हिड वॉर्नर आणि भंडाऱ्याचा किस्सा शेअर केलाय.