JAI MALHAR
esakal
DEVDUTT NAGE KHANDOBA DEVOTION STORY: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. दाक्षिणात्य सिनेमामध्येही त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. देवदत्त नागे याची जय मल्हार ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेमुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. दरम्यान अशातच देवदत्तने एका मुलाखतीत आजही लोक खंडोबाच्या नजरेनं पाहत पाया पडतात याबद्दलचा किस्सा शेअर केलाय.