Dhanush Reveals He Sold Flowers for Idlis During Childhood
esakal
अभिनेता आणि निर्माता धनुषने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. त्याचा रांझना सिनेमा तर प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला. त्याच्या अभिनयाची प्रेक्षकांना भुरळ पडली. दरम्यान अशातच धनुषने त्याचा नवीन सिनेमा 'इडली कढाई'च्या ऑडिओ लॉन्च सोहळ्याला लहानपणीचा किस्सा शेअर केला. यावेळी धनुषने सांगितलं की, लहानपणी त्यांनी इडलीसाठी फुलं विकली. परंतु त्याच्या या वक्तव्यावर लोकांना प्रश्न उपस्थित केले आहेत. एका अभिनेत्याचा मुलगा असून हे असं कसं होऊ शकतं? असे प्रश्न उपस्थित झाले.