DHURANDHAR CREATES BOX OFFICE COLLECTION
esakal
Dhurandhar Box Office Collection Day 9: आदित्य धरच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आतापर्यंत नऊ दिवस झाले आहेत. या सिनेमाने ९ दिवसात अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दुसऱ्या आठवड्यातही धुरंधर मोठी कमाई करताना पहायला मिळतोय. दुसऱ्या शुक्रवारी या सिनेमाने २०.३७ टक्के कमाईत वाढ केलीय. तसंच आतापर्यंत या सिनेमाने देशभरात ३०० कोटींचा गल्ला कमावला आहे.