Dhurandhar OTT Release
esakal
Dhurandhar Heads to OTT Platform: 'धुरंधर' सिनेमा गेल्या काही दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केली आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. या सिनेमातील अभिनयापासून ते थरारक अॅक्शन सीन्सपर्यंत सगळंकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दुसऱ्या आवठवड्यात या सिनेमाने भारतात ४०० कोटींचा तर जगभरात ५०० कोटींचा गल्ला कमावला आहे. सगळीकडे आता नुसती धुरंधरची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.