Ranveer Singh Shines in ‘Dhurandhar
sakal
अभिनेता रणवीर सिंह याचा धुरंधर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 5 डिसेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या सिनेमाची प्रदर्शनाआधीपासून खूप मोठी चर्चा आहे. हा सिनेमा 1999 मध्ये झालेल्या IC-814 च्या अपहरणाची आणि 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर आधारित आहे. दरम्यान या सिनेमाची दमदार सुरुवात झाली असून हा सिनेमा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.