

digambar naik on dashavtar
ESAKAL
नाटक, मालिका , कार्यक्रम आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मराठी मातीतले कलाकार म्हणवले जाणारे लोकप्रिय अभिनेते दिगंबर नाईक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काम न मिळण्यापासून अचानक कामावरून काढून टाकण्यापर्यंत अशा अनेक गोष्टींवर भहस्य केलंय. 'वस्त्रहरण' या नाटकातून घराघरात पोहोचलेल्या दिगंबर यांना काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. इतकी चांगली कारकीर्द असूनही आपल्याला चित्रपटात घेत नसल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर कोकणच्या मातीतला कलाकार असण्याच्या नात्याने त्यांनी 'दशावतार' या चित्रपटावर टीकाही केलीये.