
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. यामध्ये रिया चक्रवर्ती हिला क्लीन चीट देण्यात आलीय. दरम्यान, सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टबाबत दिशा सालियानच्या वडिलांच्या वकिलांनी धक्कादायक दावा केलाय. सीबीआयच्या रिपोर्टला कायद्यासमोर काही महत्त्व नाहीय. न्यायालय अजूनही या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊ शकते. निलेश सी ओझा यांनी म्हटलं की, कोणालाही क्लीन चीट दिली गेली नाहीय. लोक खोट्या गोष्टी पसरवत आहेत.