
Divyanka's Shocking Revealation : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. स्पष्टवक्तेपणासाठी दिव्यांका प्रसिद्ध आहे. मराठी असो किंवा हिंदी कलाकारांच्या मानधनाचा वाद नवीन राहिला नाहीये. मालिका सुरु झाल्यानंतर कलाकारांना फी मिळण्यासाठी नव्वद दिवस वाट बघायला लावण्यावर दिव्यांकाने भाष्य करत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. काय म्हणाली दिव्यांका जाणून घेऊया.