

Clarification on health rumors of Dwayne 'The Rock' Johnson.
Sakal
हॉलीवूडचा सुपरस्टार आणि डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चा माजी चॅम्पियन ड्वेन 'द रॉक' जॉन्सन (Dwayne Johnson) याच्या प्रकृतीबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. 'द रॉक' जिमकडे जातानाचा एक फोटो व्हायरल करून त्याला क्षयरोग (Tuberculosis) आणि दीर्घकालीन संसर्ग (Chronic Infection) झाल्याचा दावा काही एक्स (X) हँडल्सवरून केला जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय माध्यम संस्था आणि द रॉकच्या अधिकृत सूत्रांनी अशा कोणत्याही आजाराची पुष्टी केलेली नाही.