एजाज खानचा शो हाऊस अरेस्ट सध्या वादात आहे. या शोवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसंच एजाज खान आणि उल्लू अॅपला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातय. राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा याप्रकरणावर अॅक्शन घेतली आहे. त्यांनी एजाज आणि उल्लू अॅपच्या मालकाला म्हणजेच विभू अग्रवाल यांना नोटीस देऊन स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहे. हाऊस अरेस्ट शोमधील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.