
Comedian Sunil Pal Missing Marathi News : प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं पोलिसात दिली आहे. दिल्लीहून मुंबईत परतताना ते तब्बल चार दिवसांपासून गायब झाल्याचं तक्रारीत त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे, त्यामुळं मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, आत्ताच्या ताज्या अपडेट नुसार सुनील पाल यांच्याशी संपर्क झाला असून ते ठीक आहेत, असं त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे. उद्या पत्रकार परिषद घेत नेमक्या काय घडामोडी घडल्या हे त्या जाहीर करणार आहेत. दैनिक भास्करनं याबाब वृत्त दिलं आहे.