
Ganpati Festival 2025
Sakal
गणेशोत्सवाच्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे. यंदाही मराठी कलाकार विविध मंडळांना भेट देत गणरायाचे आशीर्वाद घेत आहेत. जोगेश्वरीतील सुप्रसिद्ध शामनगरचा राजा मंडळात अलीकडेच दोन आगामी मराठी चित्रपटांच्या टीमने उपस्थिती लावली. ‘आतली बातमी फुटली’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांच्या कलाकारांनी मंडळात येऊन राजाचे दर्शन घेतले. दशावतार चित्रपटातील अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनी गणरायाचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दशरथ मोरे, सचिव सुरेश धुरी, खजिनदार मितेश साळवी आणि उत्सव समिती अध्यक्ष शिवाजी खैरनार यांनी कलाकार मंडळींचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.