

gashmeer mahajani
esakal
मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही गश्मीर चर्चेत असतो. दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा असूनही गश्मीरने वडिलांच्या नावाचा वापर न करता स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं. त्याचं कुटुंब कायमच लाइमलाइटपासून दूर दिसून आलंय. गश्मीरच्या पत्नीचं नाव गौरी देशमुख असून त्यांना व्योम नावाचा गोंडस मुलगा आहे. तो आपल्या आईसोबत राहतो. मात्र गश्मीरने मुलाच्या संगोपनासाठी घरी खास नियम बनवले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं.