Gautami Patil’s Car Crashes Into Auto Near Navale Bridge in Pune
esakal
Gautami Patil’s Car Accident: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या संदर्भात एक बातमी समोर आलीय. तिच्या चाहत्यांसाठी काळजी करणारी ही बातमी आहे. कारण प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या गाडीचा अपघात झालाय. अपघातांसाठी चर्चेत असलेल्या नवले इथल्या वडगाव पुलाजवळ हा अपघात झालाय. एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमी पाटीलच्या गाडीनं धडक दिलीय. या अपघातात रिक्षामध्ये असलेले दोन प्रवाशांसह रिक्षाचालक जखमी झाले आहे.