GAUTAMI PATIL FA9LA SONG viral
esakal
GAUTAMI PATIL VIRAL VIDEO: सध्या बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त धुरंधरची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. बॉक्स ऑफिसमध्ये धुरंधर धुमाकूळ घालताना पहायला मिळतोय. या सिनेमाने गेल्या काही दिवसात ७०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमातील अक्षय खन्नाच्या एन्ट्री सॉन्गने तर प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या गाण्यातील अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स सोशल मीडियावर चांगल्या व्हायरल होताय. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर भन्नाट डान्स करताना पहायला मिळताय. यात लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील सुद्धा काही मागे नाही.