GAUTAMI PATIL OPENS UP ON TROLLING
esakal
Gautami Patil Reacts to Social Media Trolling : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचे लाखो चाहते आहे. 'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणून गौतमीची ओळख आहे. गौतमी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकवेळा ती तिच्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत असते. परंतु यंदा तिची चर्चा वेगळ्याच गोष्टीमुळे होतेय. गौतमीचं 'रुपेरी वाळूत' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या गाण्यात गौतमीच्या मनमोहक अदा प्रेक्षकांना अनुभवाला मिळाल्या आहेत.