
Marathi Entertainment News : 'माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी' या गाण्याने सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. अर्थातच हे धुमाकूळ घालणारं गाणं नृत्यांगना गौतमी पाटीलच आहे. 'सोनचाफा' हे गाणं सध्या तुफान गाजतंय. गौतमीच्या मोहक अदा आणि नृत्याने या गाण्याला विशेष वजन आलं. नवरात्रोत्सवात तर या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. आणि गौतमीही यंदाच्या नवरात्रीत या गाण्यावर थिरकत साऱ्यांच मन जिंकताना दिसली.