Govinda Hospitalized After Sudden Dizziness
esakal
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याची तब्येत अचानक बिघडली आहे. त्याला उपचारासाठी जुहू इथल्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मंगळवारी रात्री गोविंदा अचानक बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर त्याला काही औषधं सुद्धा देण्यात आली. परंतु त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्यानं रात्री 1 वाजता त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं.