VIDEO: बाप तसा लेक! गोविंदाच्या मुलाच्या जबरदस्त डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

यशने पारस ओमटा या कोरियोग्राफरबरोबर हंस दी रेहन्दी है या गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्याच्या डान्सच्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वधले आहे.
Govinda
Govindaesakal

Arti Singh: अभिनेत्री आरती सिंहचा (Arti Singh) विवाहसोहळा नुकताच थाटात पार पडला. तिच्या लग्नाला तिचे मामा गोविंदा (Govinda) यांनी हजेरी लावत उभयतांना आशीर्वाद दिले. या लग्नाला गोविंदासोबत त्याचा मुलगा यशवर्धनने हजेरी लावली आणि सगळ्या मीडियाचं लक्ष त्याने वेधून घेतलं. या लग्नापासून यशवर्धनही सोशल मीडियावर चर्चेत आहेत आणि आता यशवर्धनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

काही महिन्यांपूर्वी यशने पारस ओमटा या कोरियोग्राफरबरोबर हंस दी रेहन्दी है या गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याच्या डान्स स्किल्सचं सोशल मीडियावर कौतुक केलं. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत 'तुला लवकरच सिनेमात चान्स मिळेल' असं म्हंटलं, तर अनेकांनी तू अगदी तुझ्या वडिलांसारखा आहेस असं म्हणत त्याचं कौतुक केलं.

पाहा व्हिडीओ:

यशवर्धनने अनेकदा त्याचे वडील गोविंदा यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे आणि लवकरच तो बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा अनेक काळापासून रंगली आहे. यशने लंडनच्या मेट फिल्म स्कुलमधून अभिनयाचं शिक्षण घेतलंय तर सध्या तो साजिद नादियाडवाला यांच्या आगामी किक २ या सिनेमात असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करतोय. त्याला सिनेमापेक्षा सिनेमाची निर्मिती करण्यात जास्त इंटरेस्ट असल्याचंही म्हंटलं जातंय. यशवर्धनला नर्मदा नावाची मोठी बहीण असून ती टीना म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. तिनेही सिनेमांमध्ये काम केलं आहे. कागज, सेकंड हॅन्ड हजबंड, ड्रायव्हिंग मी क्रेझी या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. नर्मदाला सिनेविश्वात तितकं यश मिळालं नाही पण सोशल मीडियावर ती कायमच चर्चेत असते.

Govinda
Govinda : कश्मिराने गोविंदाची पाया पडून मागितली माफी; अभिनेत्याच्या कृत्यामुळे तिच्या डोळ्यात आलं पाणी

गोविंदाने आरती सिंहच्या लग्नाला लावलेली हजेरी हाही सध्या चर्चेचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कृष्णा आणि गोविंदा यांच्यामध्ये वाद सुरु होता. आठ वर्षं दोन्ही कुटूंब एकमेकांशी बोलत नव्हते पण अखेर या लग्नात हजेरी लावत गोविंदा यांनी वाद मिटवला. त्यांनी कश्मिराला आशीर्वाद दिले तर तिच्या दोन्ही मुलांना जवळ घेत त्यांनाही आशीर्वाद दिले. सोशल मीडियावर लग्नाचा हा व्हिडिओसुद्धा चर्चेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com