'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील सोढ़ीची भूमिका साकारणारे टीव्ही कलाकार गुरुचरण सिंह यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या तब्यतीत बिघाड झाल्याने त्यांना एडमिट करण्यात आले आहे. त्यांनी रुग्णालयातील व्हिडिओ देखील शेअर केला आहे. परंतु त्यांना काय झाले याबाबत त्यांनी अजून खुलासा केलेला नाही.