HINA KHAN ON SHAHRUKH
Esakal
HINA KHAN REVEALS SHAH RUKH KHAN WAS SLEEPING NEXT TO HER ON FLIGHT: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. त्यात टीव्ही अभिनेत्री हिना खान सुद्धा शाहरुखची चाहती आहे. नुकतंच हिना खान आणि अभिनव शुक्ला यांनी शाहरुखसोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी तिने फोटो काढण्याचा किस्सा देखील सांगितला.