टीव्ही विश्वाची क्वीन एकता कपूर वादात सापडली आहे. भारतीय सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदारी तक्रारीचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. एकताने एक वेब सिरीज केली होती. त्या शोमध्ये तिने जवानांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.