Britney Spears photos went viral on social media
Britney Spears photos went viral on social media

Hollywood News : विस्कटलेले केस अन् हातात उशी; अर्धनग्न अवस्थेत दिसली पॉप स्टार, अ‍ॅम्ब्युलन्सही बोलवावी लागली, नेमकं घडलं काय?

Hollywood pop star exit barefoot after intense fight with boyfriend : हॉलिवूडची पॉपस्टार ब्रिटनी स्पिअर्सला मध्यरात्री अनवाणी अवस्थेत हॉटेल सोडावं लागलं. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.

Hollywood News : कायमच काही ना काही वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहणारी हॉलिवूड पॉप गायिका ब्रिटनी स्पिअर्स (Britney Spears) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता पुन्हा एकदा तिने माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ब्रिटनीचं तिच्या बॉयफ्रेंडशी जोरदार भांडण झालं आणि ती हॉटेलमधून अत्यंत वाईट अवस्थेत बाहेर पडली.

४२ वर्षांच्या असलेल्या या गायिकेला लॉस अँजेलिसमधील (Los Angeles) एका बड्या हॉटेलमधून सुरक्षितरित्या बाहेर काढताना फोटोग्राफर्सनी पाहिलं. सोशल मीडियावर तिचे टॉपलेस फोटो व्हायरल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तिला शाटू मॉरमॉण्ट (Chateau Marmont) या हॉटेलमधून सुरक्षितरित्या बाहेर काढत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

बॉयफ्रेंडशी जोरदार भांडण आणि मारामारी

टीएमझेड या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनीचं तिचा बॉयफ्रेंड पॉल रिचर्ड (Paul Richard) सोबत जोरदार भांडण झालं. ते पार्टी करण्यासाठी इथे आले होते पण त्यांचा वाद टोकाला पोहोचला आणि त्यांच्यात मारामारी झाली.

अनवाणी, अर्धनग्न, ब्लँकेट गुंडाळलेल्या अवस्थेत चेहऱ्यावर उशी धरून हॉटेलमधून बाहेर पडलेल्या ब्रिटनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अ‍ॅम्ब्युलन्स असतानाही ब्रिटनीने हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनीची हॉटेलमधून बाहेर पडताना अवस्था अतिशय वाईट होती. अ‍ॅम्ब्युलन्सला देखील यावेळी बोलवण्यात आलं होत. या भांडणात तिच्या पायाला जखम झाल्याचा अंदाज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ३ मे ला रात्री मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी पोलीस तिथे हजर नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Britney Spears photos went viral on social media
Drishyam Hollywood Remake : तमिळ, हिंदी नंतर आता हॉलीवूडमध्ये होणार अजयच्या 'दृष्यम'चा रिमेक! मेकर्सनं दिली गुड न्यूज

सोशल मीडियावर ब्रिटनीने दिलं स्पष्टीकरण

या घटनेनंतर ब्रिटनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं भांडण झालं आणि तिची मानसिक स्थिती बिघडली असल्याचं जे वृत्त पसरवलं जात आहे ती निव्वळ अफवा आहे असं म्हंटलं आहे. तिने तिला काही काळ शांततेची गरज आहे आणि ती खूपच खंबीर आहे असं म्हंटलं . तिचा फक्त पाय मुरगळला आहे आणि वैद्यकीय कर्मचारी न बोलावताच तिथे आले हे तिला आवडलं नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.

दरम्यान,सॅम असगरीला घटस्फोट दिल्यानंतर ब्रिटनी पॉलला डेट करत होती. पण पॉलवर अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्या नात्यात बराच तणाव होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com