'जुळून येती रेशीमगाठी' चा दुसरा भाग येणार? ललित प्रभाकरने खरं काय ते सांगितलंच, म्हणाला, 'आता पुन्हा एकदा...'

LALIT-PRABHAKAR-ON-JULUN-YETI-RESHIMGATHI-PART-2: 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता या मालिकेचा दुसरा भाग येणार का याचं उत्तर ललित प्रभाकरने दिलं आहे.
lalit prabhakar

lalit prabhakar

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका या प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहतात. त्यातही काही जुन्या मालिका या प्रेक्षकांना जगण्याची नवी दिशा दाखवतात. त्यातील कणखर नायिकेमध्ये स्त्रिया स्वतःला पाहतात. तर एखादी मालिका प्रेमाची परिभाषा नव्याने शिकवते. अशीच एक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती ती म्हणजे प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका. काही दिवसांपूर्वी ललित आणि प्राजक्ता एकत्र दिसले होते. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग येणार का याबद्दल चर्चा सुरू झाल्या, आता त्यावर ललितने उत्तर दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com