What Happens to Disney+Hotstar and JioCinema Users? : ‘वायकॉम १८’ आणि ‘स्टार इंडिया’ च्या विलीनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांनी मिळून ‘जिओहॉटस्टार’ ही नवी ओटीटी वाहिनी सुरु केली आहे. आज व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर या ओटीटी वाहिनीची सुरुवात करण्यात आली आहे. ही भारतातली सर्वात मोठी ओटीटी वाहिनी असल्याचं बोललं जातंय. दोन्ही कंपन्यांकडे एकूण ५० कोटी ग्राहक आहेत. या ग्राहकांना आता दोन्ही ओटीटीवरील सर्व कटेंट एकाच ठिकाणी बघता येणार आहे.