
मुंबई : काटा लगा गर्ल आणि बिग बॉस १३ मधील प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले असल्याची बातमी समोर आली आहे. २७ जून रोजी रात्री शेफालीला हृदयविकाराचा झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मनोरंजन उद्योगासह तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.