सध्या देशात हिंडेनबर्गने दिलेल्या अहवालाची जोरदार चर्चा आहे. अदानींशी संबंधित एका मोठ्या घोटाळ्यात त्या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सेबीमधील चेअरमनची आणि त्यांच्या पतीची भागीदारी असल्याचं सत्य या (Hindenburg Report)अहवालात समोर आणण्यात आलं. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं होतं. मात्र राहुल गांधींच्या वक्तव्यावरून अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत हिने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तिने एक ट्वीट करत त्यांना धोकादायक आणि विषारी म्हटलं आहे.
कंगनाने ट्वीट करत लिहिलं, 'राहुल गांधी हा सर्वात धोकादायक माणूस आहे, तो कडू, विषारी आणि विध्वंसक आहे, त्यांचा अजेंडा असा आहे की जर ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत तर ते या देशालाही नष्ट करू करतील. आमच्या शेअर बाजाराला लक्ष्य करणाऱ्या हिंडनबर्गच्या अहवालाचं काल रात्री राहुल गांधी समर्थन करत होते, तो आता फोल ठरला आहे. ते या देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गांधीजी, तुम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात बसायला तयार व्हा आणि तुझ्यासारखा माणूस देशाच्या प्रगतीच्या आड येतोय. ते तुला त्यांचा नेता कधीच बनवणार नाहीत. तू कलंक आहेस. '
अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा नवा अहवाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सेबीच्या चेअरमन माधवी पुरी-बूच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचाही हात असल्याचा खुलासा या अहवालातून करण्यात आला. हिंडेनबर्ग रिसर्चनं 10 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, "SEBIच्या अध्यक्षा माधबी पुरी आणि त्यांचे पती धवल बूच यांची अदानींच्या मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या दोन्ही ऑफशोर निधींमध्ये भागीदारी होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.