

Bollywood Entertainment News : महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत. पण महाराजांच्या कार्याची भुरळ आता बॉलिवूडलाही पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नुकत्याच एका बिग बजेट सिनेमाची घोषणा करण्यात आली. विशेष साऊथ इंडस्ट्रीमधील आघाडीचा सुपरस्टार या सिनेमात शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.