

kbc 18 winner bhushan thakare
esakal
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' मध्ये सगळे मोठी स्वप्न घेऊन येतात. कुणाची स्वप्न पूर्ण हातात तर कुणाची होत नाहीत. केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खेळायचा हा खेळ एका उत्तराने तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकतो. या कार्यक्रमाचे आजवर १८ सीझन झालेत. आता या अठराव्या सीझनला त्याचा पहिला करोडपती मिळालाय. खिशात अवघे २४ रुपये घेऊन मुंबईत आलेला भूषण ठाकरे 'कौन बनेगा करोडपती १८' चा पहिला करोडपती बनलाय. आता तो ७ कोटींच्या प्रश्नासाठी खेळणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याला आभाळ ठेंगणं झालंय. कोण आहे भूषण ठाकरे?