प्रार्थना आणि निर्मिती यांच्या 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'चा टीझर रिलीज; प्रेक्षक करतायेत कौतुक

Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai Teaser Out : केदार शिंदे दिग्दर्शित अगं अगं सुनबाई ! काय म्हणताय सासूबाई ? या आगामी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. कसा आहे या सिनेमाचा टीझर जाणून घेऊया.
Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai Teaser Out

Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai Teaser Out

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओजचा बहुचर्चित मराठी चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पाठमोऱ्या दिसणाऱ्या सासू-सुनेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला होता, तो म्हणजे ही जोडी नेमकी कोणाची? आणि आता या प्रश्नाचं उत्तर देत, मनोरंजनाची पूर्ण तयारी करत चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टिमने मुंबईतील महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेत, चित्रपटाच्या टिझरचे आणि पोस्टरचे अनावरण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com