Pawan Kalyan: "नवऱ्याच औक्षण करणारी रशियन बायको!" काय आहे सुपरस्टार पवन कल्याण यांच्या तिसऱ्या लग्नाची हटके लव्ह स्टोरी

Who is Anna Lezhneva: पवन कल्याण आणि अ‍ॅना लेझनेवा यांच्या हटके लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात...
Anna Lezhneva
Pawan Kalyan love storyesakal

Pawan Kalyan: आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू अभिनेता-राजकारणी पवन कल्याण विजयी झाले. जनता सेना पक्षाचे (JSP) समर्थक आणि पवन कल्याण यांचे नातेवाईक राज्य निवडणुकीतील पवन कल्याण यांच्या विजयामुळे आनंदी झाले. निवडणुकीच्या निकालानंतर पवन कल्याण लगेच घरी आले आणि त्यांची पत्नी अ‍ॅना लेझनेवानं (pawan kalyan) त्यांचे स्वागत केले.

अ‍ॅना लेझनेवा यांनी पवन कल्याण यांचे कपाळाला टिळा लावून आणि औक्षण करुन स्वागत केलं. पवन कल्याण यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्या पत्नीचा पाठिंबा मिळाला आहे. पवन कल्याण आणि अ‍ॅना लेझनेवा (Anna Lezhneva) यांच्या हटके लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात...

पवन कल्याण आणि अ‍ॅना लेझनेवा यांची लव्ह स्टोरी

रशियन मॉडेल आणि अभिनेत्री अ‍ॅना लेझनेवा ही पवन कल्याणची पहिली नसून तिसरी पत्नी आहे. 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'तीन माँ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अ‍ॅना लेझनेवा आणि पवन कल्याण यांची ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अ‍ॅना लेझनेवा आणि पवन कल्याण हे 30 सप्टेंबर 2013 रोजी लग्नबंधनात अडकले. 2017 मध्ये पवन आणि अ‍ॅना यांना एक मुलगा झाला. त्यांच्या मुलाचे नाव मार्क शंकर पावोनोविच असं आहे.

पवन कल्याण आणि अ‍ॅना यांच्यात मतभेदाची अफवा

गेल्या वर्षी अ‍ॅना आणि पवन कल्याण यांच्यात मतभेद झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अ‍ॅना आणि पवन कल्याण हे दोघेही एकत्र राहत नाही, अशी चर्चा सुरु होती. या अफवांच्या दरम्यान, हे देखील समोर आले की पवन कल्याणचे त्याचा भाऊ चिरंजीवीसोबत मतभेद आहेत. अ‍ॅना आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पवन कल्याण यांना निवडणुकीच्या वेळी ज्या प्रकारे पाठिंबा दिला, त्यावरून सर्वजण एकत्र असून त्यांच्यातील प्रेम पूर्वीसारखेच असल्याचे स्पष्ट झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com