Ankita walavalkar Supports Pranit More in Bigg Boss 19
esakal
Bigg Boss 19: 'बिग बॉस 19' शो पुन्हा सुरु होऊन आता महिना झालाय. आता शोमध्ये स्पर्धकांमध्ये मोठी स्पर्धा लागलेलं पहायला मिळतय. रोज नवनवीन रंगत यायला लागली आहे. टास्कसाठी भांडण, वादविवाद होताना पहायला मिळतात. मराठमोळा प्रणित मोरे सुद्धा या शोचा भाग आहे. तो देखील एकदम भारी खेळत आहे. अशातच प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात चांगलाच वाद झालाय. या वादानंतर संपुर्ण महाराष्ट्राने प्रणित मोरेला सपोर्ट केलेलं पहायला मिळतय.