
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनातून टीका केल्यानंतर अडचणीत आलेल्या कुणाल कामराविरोधात आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतरही कुणाल कामराने त्याच्या नया भारत या व्हिडीओतल्या आणखी एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करण्यात आलीय. आता कुणाल कामराने आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर केली असून यातून संताप व्यक्त केलाय.