Lalit Prabhakar as Ajmal Kasab first look
ESAKAL
LALIT PRABHAKAR SHOCKING TRANSFORMATION FOR KASAB ROLE: ललित प्रभाकर हा मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर ललितने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यानं अनेक सिनेमांमध्ये रोमँटिक भूमिका निभावल्या. दरम्यान अनेक मुलींचं क्रश असलेल्या ललितचा एक वेगळा अवतार पहायला मिळणार आहे. त्याचा अजमल कसाबच्या भूमिकेतील पहिला लूक समोर आलाय. त्याचा लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.