prajakta mali on kasab
esakal
PRAJAKTA MALI REACTION TO LALIT PRABHAKAR KASAB ROLE: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर याची सध्या बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. लवकरच तो प्रहार हा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो 'कसाब'च्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये कसाबसारखा लूक, हावभाव, त्याचं उर्मट बोलणं पाहून चाहते थक्क झालेत. ट्रेलरनंतर ललीतच सगळीकडे कौतूक होताना पहायला मिळतय.