Lalit Prabhakar Reveals Struggle Story
esakal
अभिनेता ललित प्रभाकर याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेतून तो घराघरात पोहचला. मेघानाचा आदित्य सगळ्यांनाच आवडू लागला. प्रत्येक मुलीला आपला लाईफ पार्टनर आदित्य असावा असं वाटू लागलं. दरम्यान अशातच आता ललितचा हृदा दुर्गुळेसोबत 'आरपार' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे.