सध्या सोशल मीडियावर झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. सध्या मालिकेत सिद्धू आणि भावनाचा लग्नसोहळा दाखवण्यात येत आहे. मालिकेत दळवी कुटुंबीय आणि गाडेपाटील कुटुंब दोन्ही लग्नाच्या तयारीला लागले आहे. भावनासोबत लग्न होत असल्याने सिद्धू सुद्धा खूप खुश दिसतोय. परंतु भावना कुठेतरी नाराज असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे.