Laxmi Niwas Fame Meghan Jadhav Marries Anushka Pimputkar Viral Video
esakal
'लक्ष्मी निवास' मालिकेत जयंतची भूमिका साकारणारा मेघन जाधव घराघरात पोहचला आहे. त्याने जान्हवीला दिलेली शिक्षा आणि त्याचा तो अतरंगी स्वभाव यामुळे तो प्रेक्षकांच्यासाठी व्हिलन ठरला. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र मेघन जाधव खूप साधा आणि समजुतदार आहे. काही दिवसापूर्वी त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याच्या आयुष्यात असलेल्या खऱ्या जान्हवीला चाहत्यांना दाखवलं होतं.