बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. माधुरी दीक्षितने अनेक चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'हम आपके है कोन' हा चित्रपट प्रचंड हिट झाला. या चित्रपटाबरोबरच माधुरीच्या 'दयावान' चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली होती. विनोद खन्नासोबत तिने या चित्रपटात काही इंटिमेट सीन दिले होते.