tukaram-mundhe-action
esakal
FOOD SAFETY RULES FOR FILM SHOOTING LOCATIONS IN MAHARASHTRA: चित्रीकरण स्थळी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळावे, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे आणि चित्रीकरण स्थळांवर अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अन्नाच्या गुणवत्तेबाबत तपासणी व्हावी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांची नुकतीच भेट घेतली आणि त्यांना रीतसर निवेदन देण्यात आले.