आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

ANSHUMAN VICHARE NEW MAHINDRA XEV9S CAR: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अंशुमन विचारे यांनी नवीन Mahindra XEV9S कार खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वी नवीन घर घेतल्यानंतर आता त्यांनी कुटुंबासोबत नव्या गाडीचं स्वागत केलं.
MAHARASHTRACHI HASYAJATRA ACTOR

MAHARASHTRACHI HASYAJATRA ACTOR

esakal

Updated on

MAHARASHTRACHI HASYAJATRA ACTOR NEW LUXURY CAR: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता अंशुमन विचारे हा घराघरात पोहचला आहे. त्यानं विनोदी कार्यक्रमांतून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंशुमननं आजवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. त्याचबरोबर त्याने नाटक आणि सिनेसृष्टीत सुद्धा आपला अभिनय दाखवून दिलाय. दरम्यान काही दिवसापूर्वी अंशुमननं घर खरेदी केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आनंदाची बातमी सुद्धा दिली होती. आता अंशुमननं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने चाहत्यांसोबत एक गोष्ट शेअर केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com